मलाच कळेना
मलाच कळेना
मलाच कळेना
मलाच समजेना
मलाच उमजेना
ती इतकं प्रेम का करते.....!
तुझ्या नावाची चर्चा ऐकून
तुझ्या प्रेमाची किर्ती बघून
तुझ्या शब्दांची गोडी ओळखून
खरंच तू जीव जातो लावून.
अश्रूंत तूं जातो आठवणी लपवून
खरं प्रेम हे कधीच नाही दिले कळून......!
कधी हसत जातो बोलुन
कधी रागात जातो सांगून
कधी शब्द मनात जातो ठेऊन
कधी मला शप्पथ जातो देऊन.
मलाचं माझे बोलणे टोचते
मलाच माझे वागणे खटकते
मलाच माझे डोळे रडवते
मलाच माझे हसणे एकटे भावते
शेवटी तुझ्या भावनांची कविता रचू वाटते....
अशीच कोरे पाने लिहून
तुझ्या शिवाय दुसरे कुणाला
माझ्या खऱ्या प्रेमाची भाषा उमजेल ग
तुझ्या शिवाय बाकी कुणाला कोडं
सुटेल ग .
तुला सांगितले होते ग
मला इतका जीव नको लावू ग
शेवटी किती काय केलं
नशिबा पुढे कुणाचं चाललंय का ग
बोल आत्ता तूचं ग.....!
