लेखकाच्या कविता वाचून.....!
लेखकाच्या कविता वाचून.....!
लेखकाच्या कविता वाचून
त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा
मारून एक कविता लिहायला
एक नवीन मैत्री होते.....!
अशीच एक ओळख खूप
काही शिकवून जाते. त्या
लेखकाचे पुरेसे मार्गदर्शन
खूप लिहिण्यास प्रवृत्त करते...!
बऱ्याच वेळा असं होते
त्यांची कविता वाचून
तसं लिहू वाटते....!
आपल्याच मनाला
तसं करायला आपलेच
मन नकार देऊन टाकते.....!
प्रत्येकाची पद्धत वेगळी असते
अजून कशी चांगल्या प्रकारे
बनवू अशी मनाला आशा लावते....!
नवनवीन कल्पना येती
असेच लेखकांची ओळख शब्दांची
जाणीव करून देती.....!
लेखकाच्या कविता वाचून
त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा
मारून एक कविता लिहायला
एक नवीन मैत्री होते.....!
