मी तुझ्यात दिसतो का मला...
मी तुझ्यात दिसतो का मला...
1 min
443
आज उगीच का असा प्रश्न पडला हा मला
मी तुझ्यात दिसतो का मला..
आज तुझ्या डोळ्यांत तू मला जरा
भावशून्य होऊन तू पाहू देशील का जरा..
हा भास होता की तुझ्या त्या डोळ्यांची होती नशा
आज तुझ्याच दिशेने ओढत होती
मला ही दाही दिशा..
बघता क्षणी का तुझ्या डोळ्यांत मला
माझंच प्रतिबिंब आज दिसलं मला..
खरं सांग तू आता खोटं नको बोलू राणी
होती का माझ्याही डोळ्यात
आपल्या प्रेमाची कहाणी..
तू माझ्यात दिसतेस जशी मला
तसा मी तुझ्यात दिसतो का मला...
