मी मंत्रालय बोलतोय
मी मंत्रालय बोलतोय
1 min
209
पाच वर्षे तुम्ही माझ्यावर येता,
येता तर येता हवं तेवढं खाता
सरकारी टॅक्स कमी भरता
टेबलाखालूनच हराम घेता
मंत्रालयातला शुकशुकाट पाहता,
१८ दिवसांची चिरतरुण शांतता
पुन्हा होणार इथेच हा तुझा वाटा,
हा माझा वाटा, रोजच येता-जाता
काय मिळतं? सांगा राज्य करुन
जिंकलास तर जेता, हरला तर नेता..
मंत्रालयाचा दार जोरात लोटून बघता
मतांचं घर लुटून, प्रशासन वेठीस होता..!