मैत्रीण...
मैत्रीण...
1 min
393
असावी अशी माझी
एक तरी मैत्रीण
माझ्या मैत्रीला मनात
जपून ठेवणारी
कधी मनातून बाहेर काढणारी
अशी असावी माझी
एक तरी मैत्रीण
कधी प्रेमाने बोलणारी..
तर बोलतात बोलता
वाकड्यात शिरणारी
गालातल्या गलात लजणारी
असावी अशी माझी
एक तरी मैत्रीण
रोज काहीतरी बोलणारी
उगच बोरं करणारी
टोमणे मारून बोलणारी
असावी अशी माझी
एक तरी मैत्रीण
मी दिसलो नाही कधी
तर ती व्याकुळ होणारी
मी रुसून बसलो कधी
तर मला येऊन मनवणारी
असावी अशी माझी
एक तरी मैत्रीण...
जास्त नसलं तरी चालेल
पण मनातून माझ्यावर
थोडं प्रेम करणारी
काळजी थोडी करणारी
माझ्यासाठी कधीतरी
डोळ्यातून अश्रू वाहणारी
मनातील गुपिताला कधी
न लपवणारी
अशी असावी माझी एक तरी मैत्रीण
