STORYMIRROR

Nilesh Bamne

Others

3  

Nilesh Bamne

Others

मैत्रीण

मैत्रीण

1 min
173

आज अचानक 

भेटली मला

माझी एक मैत्रीण

भरभरून बोलली ती 

मग मी ही बोललो

भराभर...

 

ती म्हणाली मला

कोणाच्या प्रेमात

पडू नकोस...

त्यावर मी म्हणालो,

आता नाही पडणार...


शब्द संपले

माझ्याजवळचे

आता कोणासाठीचे...

तिच्याकडे चार शब्द

नव्हते माझ्यासाठी...

हे कळले तेव्हाच 

उडाला माझा विश्वास

प्रेमावरचा...


आता माझ्या शब्दांची

किंमत कळेल तिला

आणि माझीही...


मी किती दगड आहे

हे तुला माहीत आहे

त्यावर ती हसून म्हणाली

फक्त मला...?


मग मी ही

हसलो गालात...

ती कफल्लक

कोण होती माहीत नाही

पण तुझ्या शब्दांचे

मूल्य... मला विचार 

ती आसवे पुसत म्हणाली...


माझे शब्द भविष्य ओळखतात

हे जाणून आहे मी...

तरी तू तिच्या प्रेमात पडलास ?

तिचं भविष्य बदलू पहात होतो

पण नियतीने मलाच

गुडघे टेकायला लावले

तिच्यासमोर...


त्यावर ती हसून म्हणाली

नालायक आहेस तू...

दुसरी भेटली म्हण

तुझ्या शब्दांना

किंमत देणारी

माझ्यासारखी...


त्यावर मी 

पुन्हा हसलो

मनापासून...


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ