मैत्री
मैत्री
1 min
27.1K
मैत्री ही तर कविता आहे,
झुळ झुळ वहाती सरिता आहे !
समुद्रा च्या लाटे सारखी,
मजा-मस्ती मदहोसी सारखी,
स्फूर्ती अन् उन्मादा सारखी,
विश्वा च्या अनंता सारखी आहे ती !
मैत्री ही तर कविता आहे,
झुळ झुळ वहाती सरिता आहे !
कोकीळे च्या गाण्या सारखी,
पाखरांच्या किलबील सारखी,
हंसा च्या जोडी सारखी,
पोपट अन् मैना आहे ती !
मैत्री ही तर कविता आहे,
झुळ झुळ वहाती सरिता आहे !
लैला अन् मजनुं सारखी,
हीर अन् रांझा सारखी,
प्रभु प्रीय संसारा सारखी,
माझ्या कल्पने च्या तरंगा सारखी
आहे ती !
मैत्री ही तर कविता आहे,
झुळ झुळ वहाती सरिता आहे !
..... रचना : हरसुख हं पीठडिया
