STORYMIRROR

Hersukh Pithadia

Others

3  

Hersukh Pithadia

Others

माझी मायाळू आई

माझी मायाळू आई

1 min
225

आई आहे ती माझी आहे,

सगळ्या जगावेगळी आहे..!


स्त्री जातीची शोभा वाढवली,

म्हणून पूज्य स्थान ती पावली..!


प्रेम, प्रतिक्षा आणी त्यागा ची देवी,

ती तर माझ्या भवितव्याची देवी..!


खूप खूप कष्ट सोसले,

आता पर्यंत ते माझ्या पासून लपवले..!


लहानपण, तरूण पणात सांभाळ माझी घेतली,

मोठ्या घोळक्यात सुध्धा उठून दिसते माऊली..!


माझ्या लग्नात, नोकरीत तीचा उत्साह दांडगा,

आईच्या प्रेमाचा जगात नाही तोडगा..!


वाट पाहते अजूनही माझी, म्हतारपणी तीच्या,

मागणी घालते देवाला सुखी जीवनाची आमच्या..!


आठवले त्याग तीचे तर डोळे भरून आले,

पवित्र बोल तीचे माझ्या मनांत सामावले..!


माझ्यासाठी तर तीच परमेश्वर आणि तीच देवी,

जगत जननीची गोष्ट काय तुम्हा सांगावी..!


आई आहे ती माझी आहे,

सगळ्या जगा वेगळी आहे..!


Rate this content
Log in