STORYMIRROR

Laxman

Others

2  

Laxman

Others

मैत्री

मैत्री

1 min
14.9K


किस्से जुने आठवता पाणी डोळ्यामध्ये दाटे

खेळ मैत्रीचे मांडावया पुन्हा लहान व्हावे वाटे लहानसहान गोष्टीवरून करायचो आम्ही कट्टी

नवीन खेळ खेळताना लगेचच व्हायची गट्टी

एका चिंधीतली भाकर अन् झर्यातलं उष्ट पाणी रानपाखरांसोबत दिसभर गायलेली गोडगोड गाणी

कितींदा पत्करलेला धोका लपवताना मित्रांच्या चुका मैत्री न विसरण्याच्या त्या किती घेतल्या आणाभाका

वय जसं-जसं वाढत गेलं मन संसारात रमु लागलं मैत्रीतील अंतर हळूहळू जास्तच वाढायला लागलं

माझे जीवलग मित्र कधीतरी आता वाट्सॲपवर भेटतात

जोकवर मिळालेल्या त्यांच्या स्माईली खोट्याच वाटतात .


Rate this content
Log in