STORYMIRROR

Laxman

Others

2  

Laxman

Others

गुढीपाडवा

गुढीपाडवा

1 min
2.8K


नवीन किरण नवीन पहाट| नाविन्याची लाट चरोचरी||

चैञ महिन्यात नविन हे वर्ष| मनामध्ये हर्ष दिसतसे||

उभारली दारी| आनंदाची गुढी| बोलण्यात गोडी| वाढतसे||

माळुनी गजरा नेसुनिया साडी| उभी राहे गुढी आसमंती||

चंदनाची काठी सोन्याचा तो करा कडूलिंब तुरा शोभतसे|| मराठी अस्मिता करूया जतन|

होईल पतन दुरीताचे||

तेजोमयी होवो| जीवन प्रवास| हीच मनी आस| आमुचिया|| 


Rate this content
Log in