मातीतला सुगंध
मातीतला सुगंध

1 min

7
अन्याय आठवांचा खपवून घेत नाही
सुकलेय शेत सारे कोणी सवेत नाही
आधार सावलीने विकलाय पावलांचा
आता तुझ्या मनाला मी साद देत नाही
बदनाम मीच झालो का दोष द्या कुणाला?
थकलेत ते कधीचे त्यांचाच बेत नाही
गेले उडून पक्षी झालीत ओस घरटी
कानावरी पहाटे किलबिल येत नाही
खळगी भरावयाला मी शहर गाठलेले
मातीतला सुगंध इथल्या हवेत नाही