STORYMIRROR

Ashpak Talikote

Others

4  

Ashpak Talikote

Others

माणसात मला आणशील का ?

माणसात मला आणशील का ?

1 min
363

शरीराच्या आगीत रोज जळत आहे..

पोट दिलंस तू आणि भुकेसाठी मी पोळत आहे

कधी स्टॅण्डवर तर कधी मंदिराबाहेर भिक मागून खातो

शाळेचं दार बघून पोटावर हात फिरवतो

माझी शाळा तू भरवशील का?

शरीर दिलं माणसाचं माणसात मला आणशील का? 


भिक मागतो तडफडतो भुकेला 

स्वार्थी आहे दुनिया कामाशिवाय जेवू देत नाही

तुलाही त्यात मोडतात का?

पावलास तू की नैवेद्य, नारळ फोडतात का? 

मला पण तू पावशील का?

हातातील भिके वाटी काढून पेन-पुस्तक देशील का?

शरीर दिलं माणसाचं माणसात मला आणशील का? 


मी भिकारी तुच्छ म्हणून मला सगळे बघतात 

मागितलं काही जेवायला तर उरलं-सुरलं देतात 

फाटक्या कापड्यांना देवा तू शिवशिल का?

मी पण माणूस आहे सगळ्यांना तू सांगशील का?

माणूस म्हणून जगायचंय मला, माणसात मला आणशील का?


शोधतो रोज जेवण इकडं तिकडं

कधी हॉटेलच्या बाहेर तर उकंड्याच्या पलिकडं

भुकेच्या यातनेने डोळे जातात वाहून 

कित्येक दिवस झाले देवा ताजं जेवण खाऊन 

माझं तू ऐकशील का ?

शरीर दिलं माणसाचं माणसात मला आणशील का? 


तुला तर मुर्तीत पण ते पाहतात..

मग मी सगळ्यांना माणूस का वाटत नाही..

मलाही तूच बनवलंस हे देवा सगळ्यांना का सांगत नाही

सगळ्यांना तू समजवशील का?

माणूस म्हणून जगायचंय मला 

माणसात मला आणशील का?


Rate this content
Log in