STORYMIRROR

Ashpak Talikote

Others

3  

Ashpak Talikote

Others

का हे माझे स्वातंत्र्य आहे?

का हे माझे स्वातंत्र्य आहे?

1 min
11

शिक्षणाचे ते स्वप्न मोडुनी, मजुरीचे खडे फोडूनी 

शाळेचं पुस्तक सोडुनी ,हाती का ही टिकाव -टोपली आहे

दप्तराच्या खाद्यावरती का हे जबाबदारी च ओझ आहे

बाल-मजुरी च्या शोकोटी वरती देशाचं भविष्य जळत आहे

बालपण हे विचारत आहे

का हे माझे स्वातंत्र्य आहे ?


घरची शोभा मी लक्ष्मी आहे 

रूढी परंपरा ला का मीच बांधली आहे 

मी नजर झुकवावे चालावे डोळे खाली करुनी 

पैजनाच्या नावावर का बेड्या बाधंल्या आहे

विचारी माझे हक्क मला 

का हे माझे स्वातंत्र्य आहे ?


फॅशन चृया दुनियेत का फक्त माझेच अंग दिसत आहे ?

वासनाने भुकेल्या नजरा का माझ्यावर गडले आहे.

फक्त मुलगी म्हणून का मी उंबरठ्याच्या आत आहे

करुनी बलात्कार नराधम इथं बाहेर फिरत आहे.

का हे माझे स्वातंत्र्य आहे ?


प्राण गमवुनी फाशी चढुनी 

मिळाले हे स्वातंत्र्य आहे.

बंधुते अन् समते वरती फडकत हा तिरंगा आहे

वाटुनी जात - धर्मात माणुसकीचा झाड तुटतं आहे.

आज विचारत देश आहे

का हे माझे स्वातंत्र्य आहे ?


Rate this content
Log in