माझ्या गावाची दिवाळी
माझ्या गावाची दिवाळी
1 min
354
माझ्या गावाची दिवाळी
दिवा वातीने सजली
वसुबारस दिवशी
गोधनाची पूजा केली
माझ्या गावाची दिवाळी
दान धर्माने वाहिली
गोरगरिबांचे डोळे
आनंदाश्रुने भरली
माझ्या गावाची दिवाळी
ह्या रांगोळीने रंगली
रंगबिरंगी फराळी
थाळ्या इथे ग सजली
आल्या ह्या गावाच्या लेकी
भाऊबीजेच्या दिवशी
माझ्या गावाची दिवाळी
साजरा झाली हि अशी
