Narsing Sonare

Others

3  

Narsing Sonare

Others

काळोख दिवसाचा

काळोख दिवसाचा

1 min
254


आभाळात सर्व दूर-दूर काळोख दिवसाचा 

अंदाज भासत होतास मृदगंध पावसाचा ||धृ||


    बोडख्या पान-झाड नवनवी पालवी आली

    अंकुर फूल पाहून मन बहरुनी आली

फुलांच्या स्वर्गात गंध दरवळतो आनंदाचा ||१||


    धरतीच्या आशेने येतो रिमझिम पाऊस

    मिळतो इथे आम्हाला प्रसन्नतेचा सुहास

येतो छानगंध वाऱ्यासंग माती ही भिजल्याचा ||२||


    पहिल्याच पावसाने धरती फुलून जाती

    दूरवर जाऊनी मृदगंध दरवळती

मातीत नवे अंकुर चोहिकडेही दिसायचा ||३||


    हर्षाने येऊनी गाती अंबेराईच्या वनात

    नाचती मोर-मोरणी पहिल्याच पावसात

पावसाची आगमना सांगती चक्र विकासाचा ||४||


    काळे मेघ बरसतील म्हणून वाट पाही

    तप्त उन्हात तपलेली माझी माय भूमिही

मिळावा नरशाला किरण हिरवळ मनाचा ||५||          


Rate this content
Log in