माझी कविता
माझी कविता
1 min
755
माझी कविता
बहरलेल्या मनात
दोन शब्द फुलतात
मिठलेल्या ओठातून
दोन सुर खुलतात
अमृत रूपी विचार
मृत शब्द जागवतात
स्तब्ध असे हात
लेखणी कडे वळतात
एक एक विचार
लेखणीतून उमटतात
एका एका शब्दात
माझ्या कविता जन्मतात
कविता म्हणजे
केवळ निर्जीव
शब्द नसतात
मरणाऱ्याला त्या जगवतात
आणि जगणार्याला
जीवनानुभव सांगतात
