STORYMIRROR

SHRIKANT PATIL

Others

3  

SHRIKANT PATIL

Others

एक होती चिमणी

एक होती चिमणी

1 min
1.7K


कोवळ्या उन्हात

दारापुढंच्या अंगणात

दाणे टिपत

खेळायची चिमणी


आजीच्या गोष्टीत

आईच्या गाण्यात

मनाच्या आकाशात

उडायची चिमणी


विजेच्या तारेवर

रांगेत बसून

चिव चिव करत

डुलायची चिमणी


परसातल्या बागेत

बाभळीच्या झाडावर

छोटसं घरटं

बांधायची चिमणी


पण .....

टॉवरच्या जाळ्यात

कॉंक्रीटच्या जंगलात

फ्लॅटच्या संस्कृतीत

आज हरवली ही चिमणी


विज्ञानाच्या युगात

आभासी या जगात

पुस्तकातल्या चित्रातच

दाखवायची का चिमणी?


घराच्या गच्चीवर

ग्रीलच्या कोनाड्यात

ठेवा कण्याचा खाऊ

जगायला ही चिमणी


दारातल्या वाटीत

ठेवा थोडं पाणी

द्या तिला आसरा

नाही तर ...

म्हणावं लागेल

एक होती चिमणी.

एक होती चिमणी.



Rate this content
Log in