माझी दिवाळी
माझी दिवाळी
1 min
125
दिवाळी ही सणांची
माझ्या नात्यांच्या अनुबंधातील
ही आहे शुद्ध विचारांची
ही सामाजिक बांधिलकी जपणारी
ती आयुष्याची आठवणी काढणारी
सुख शोधण्याचा प्रयत्न करणारी
प्रथा परंपरा मनापासून
प्रेमाने जपणारी
दिवाळी माझी आहे
फराळाचा मनापासून आस्वाद घेणारी
दादांच्या अंगणात रांगोळी काढणारी
जीवन रंग भरून टाकणारी
दारात प्रकाशित कंदील लावुन
उजेड मनात उजेड करणारी
पणती लावून लक्ष्मीचे स्वागत करणारी
चिरोटे फोडून नरकचतुर्दशी साजरी करणारी
ही नवीन संकल्प करून फटाके फोडणारी
घरीच उटणे तयार करून
लावून शरीर शुद्ध करणारी
ही माझी दिवाळी
भाऊ बहिण तील गोडवा
कायम ठेवणारी
ही माझी दिवाळी
