STORYMIRROR

Kashmira Gupte

Others Children

3  

Kashmira Gupte

Others Children

कविता माझ्या मनातली

कविता माझ्या मनातली

1 min
169

माझी कविता

माझी लेखणी

कविता माझ्या मनातली

कधी येई वाऱ्यासवे

कधी निघते लाटांसवे

कधी वाट दाखवी चाले

कधी विचार करता येई समोरी

संघर्षात जोड लावूनी

उच्च विचारसरणी वापरूनी

धरी हात घट्ट पकडूनी

कविता माझ्या मनातली

काही असे समोरी

येई निर्माण होई कविता

नाही त्या अंतर कशाचे

नाही भान शब्दांचे

नाही अर्थ वाक्यांचे

तरी निर्माण होई

माझ्या मनातली कविता

जगातील, सभोवताली

भान विसरूनी मनांतूनी , बुद्धीतून

कविता येई उतरी लेखणीमधूनी

कविता माझ्या मनातली


साहित्याला गुण द्या
लॉग इन