मादकता
मादकता
1 min
544
तिने मला सहज विचारलं
तुला मादक स्त्रिया
का आवडतात ?
त्यावर मी किंचित
गंभीर होऊन म्हणालो
त्या मोकळ्या असतात
विचाराने आणि पोशाखानेही
त्यांची मादकता
हे प्रतिबिंब असत
त्यांच्या मोकळ्या मनाचं
त्या बंदनांना जुमानत नाहीत
या विश्वातील कोणत्याच
त्या स्वैर आणि स्वतंत्र असतात
काहींना वाटत त्यांची मादकता
पुरुषांना आकर्षित
करण्यासाठी असते
पण हे चूक आहे
त्याच सर्वार्थाने
स्त्रीपण जपतात...
