लग्न सोहळा
लग्न सोहळा
1 min
281
मुहूर्त ठरला श्रावण मास
योजला लग्न सोहळा खास
सजली सरिता, सजले अंबर
अवनिने आज वरला पाऊस.....1
नभाचे मंडप लतिका झाडे
शिंपले मृदुगंधाचे अत्तरसडे
मौत्तिक अक्षतांचे निमंत्रण
वारा वाजवी सनई चौघडे.......2
क्षिती नेसली शालू हिरवा
मनात पाऊस दिसे बरवा
भांग सजवतो डोंगर झरा
लल्लाटी शोभे भास्करा.......3
श्रावणघन घेऊन येती "वर"
ओवाळण्या आले सर्व चराचर
मंगलाष्टके गाती विहंग
पायधुण्या सरावले सरोवर......4
निसर्ग वधुपिता करी कन्यादान
हात धरेचा पावसा देऊन
षड्ऋतुंची घेऊनी शप्पथ
भूमी पावसाचे होते मिलन......5
