आनंदघन- एक नादमय पाऊस
आनंदघन- एक नादमय पाऊस
1 min
208
कडा कडा कडाडल्या
या दामिनी निनादल्या
मेघ मेघ दुभंगला
मृदंग ऐसा वाजला ll 1 ll
दंग गुंग ती अचंब
सृष्टी धुक्याने बाधली
चौघड्याची थाप ऐसि
मयूर नृत्य साधती ll 2 ll
रंग रंग हरित रंग
वसुंधरा नादावली
जलतरंग संग संग
सुंदरी सुखावली ll 3 ll
सरी सरी सरीं सवे
लकाकती या मेघना
बासरीची साद जणू
जागवती संवेदना ll 4 ll
थेंब थेंब जलध्वज
ओथंबती न थांबती
तार वीणेची लयीत
छेडून त्या बरसती ll 5 ll
पी-पी-पियु गात गात
पाखरे चढवी साज
अंती निस्तब्ध होऊन
संतोषला ऋतुराज ll 6 ll
