लाखात बहीण माझी
लाखात बहीण माझी


बहीण माझी आहेस
तू लाखात एक
माझ्यासाठी तूच माझी
माय तर तूच माझी लेक
तुझ्या मायेचा पदर
जशी वृक्षाची सावली
मरणास होतो टेकलो
पण तूच दुनिया दावली
लाखात बहीण माझी
माझ्या बापाहून खंबीर
तिनेच बरा केला
आजार माझा गंभीर
लाखात बहीण माझी
तीच माझा दाता
तिच्या पायापुढे झुकतो
आजही सदैव माझा माथा
हात तिच्या मायेचा
फिरे आजही पाठीवरी
माझ्यासाठी बहीण माझी
आयुष्याची संपत्ती खरी
माझ्या बहिणीच्या मायेपुढे
सारी माया रे शून्य
लाखात एक बहीण लाभली
जीवन झाले रे हे धन्य