प्रजासत्ताक दिन
प्रजासत्ताक दिन
1 min
439
प्रजासत्ताक दिन म्हणजे
केवळ प्रजेची सत्ता
राज्यघटनेचे प्रास्ताविक
वाचून सुरुवात करा आता
प्रजासत्ताक दिवसाचा सांगा
लोकांना समजावून खरा अर्थ
नको नृत्य केवळ सारी
नाचगाणी ती व्यर्थ
करमणुकीचा दिवस नाही
संविधान लोकांच्या डोक्यात घाला
जय भारत देश जय संविधान
हे सारे मिळून अभिमानाने बोला
चर्चा करा राज्यघटनेची
समजावून सांगा सर्व हक्क
राज्यघटना वाचली तर तुमचे
आमचे जीवन बदलते चक्क
राज्यघटना लागू करण्याचा
दिवस आजचा हा खरा
गैरसमज स्वातंत्र्य दिवस आणि
प्रजासत्ताकचा आता दूर सारा
कलम हक्क नैतिक कर्तव्ये
करत जा समाजात याची पेरणी
राज्यघटना आपली अर्पण
केवळ प्रजेच्याच चरणी
