STORYMIRROR

Anuradha Motewar

Others

2  

Anuradha Motewar

Others

कविता: प्रेम

कविता: प्रेम

1 min
35

पाहून सख्या तुला

माझी न मी राहिले

कळेना माझे मला,ना

जगाचे भान राहिले||1||


विसरून मी स्वत:ला

तुझी मी होत गेले

माझ्या ही नकळत मी

तुझा प्रत्येक शब्द झेले ||2||


तुझ्या जादूभ-या शब्दांनी

प्रेमात मी न्हाले

तुझ्या प्रेमळ स्पर्शाने

सख्या तृप्त मी झाले ||3||


दिवस असो की रात्र

स्वप्न मी पाहिले

नाही विचार कसला

जीवन तुला वाहिले ||4||


Rate this content
Log in