STORYMIRROR

Mangesh Medhi

Others

2  

Mangesh Medhi

Others

कृष्ण लाभला

कृष्ण लाभला

1 min
519

अमृत वर्षाव संतत धार

खळखळून वाहता यमुना प्रवाह

भ्रमित अविवेकी मुथुरेस नीज


तिमीर छेदून प्रकाश प्रकाश

वैकुंठ तेज धरतीवर साक्षात

निर्गुण हरि, श्रीकृष्ण साकार


सुटले पाश बंधन मुक्त

श्रीहरी निघाले गोकुळास


यमुनेस पुर पापभार प्रलय

निरागस बालक्रिडेत दंग

चरणस्पर्श क्षणी पापक्षालन

संथ शांत यमुनामाई रुप


नंदघरी लगबघ यंदा केवढी

गोकुळीस आतुरता सुखाची

आनंदी आनंद गोप गोपीस


हरि पावला रे पुत्र लाभला

सावळा मोहक पाहे श्रीहरी

बाललिला दावे गोकुळी


लाल आमुचा, कुमार हा

अरे गोपाल रे, हा गोविंद रे

ना ना मनमोहक हा मोहन रे

कृष्ण दिसे रे श्रीकृष्ण म्हणा रे


हरि पावला रे कृष्ण लाभला

कृष्ण जन्मला, कृष्ण लाभला


गोविंद रे गोपाल रे

कृष्ण कान्हा गोपाळ रे


साहित्याला गुण द्या
लॉग इन