STORYMIRROR

Priti Meshram

Others

3  

Priti Meshram

Others

खरे मित्र …

खरे मित्र …

1 min
13.9K


देवा कड़े केली जेव्हा, खऱ्या मित्राची मागनी.

देवच विचारतो आम्हास, असा सांगा तरी कुनी.

खरे मित्र तर जनू , लुप्तच झाले.

प्रगतीच्या एकांकी पथावर, जीवन विस्कळित झाले.

संपत्ती जमवायला, सर्वांची धडपड.

सूखाच्या दोन क्षणासाठी, कुनास नाही सवड.

स्वार्थाच्या सागरात, घृणे च्या लाटा.

सख्या भावाच्या देखील, वेगळ्या झाल्या वाटा.

परंतु ,

वैऱ्याच्या त्या वादळातही,जिव्हाळयाचे बीज रुजले.

द्वेषाच्या चिखलात ही, मैत्रीचे कमळ उमलले.

स्नेहाच्या त्या पताकांनी, संपूर्ण नभच जणू व्यापला

आनंदाचा… उल्लासाचा… गंध, चोहीकडे दरवळला.

खऱ्या मैत्रीच्या त्या थेबांनी, जीवनाचे तळे तूडूंब भरले.

मैत्रीच्या त्या चाकांवरच, जगण्याचे गाडे पुढे सरकले.

रक्ताच्या नात्यात नसावी, एवढी ओढ, खऱ्या मैत्रीत आहे.

कुठे, कशीही असली तरी, शेवटी, गोडी ती खऱ्या मैत्रीची आहे.

सुगम आठवणींच्या वेलीन वरती, विश्वासाची पालवी बहरली.

मधुर स्मृतींच्या त्या नंदनवनात , मैत्रीची फूल उमलली.

गाठी बांधलेल्या नसल्या तरी, मैत्रीचे बंध तुटले नाही.

परके झाले, दुर झाले, तरी मैत्रीचे आपलेपण सरले नाही.

कुणी कोणास काय मागावे, देवास तेव्हा उमगले.

करून मागनी त्या अटूट मैत्रिचि, जगन्याचे अर्थ देवास समजले.

देवुन आशीवार्द त्या खऱ्या मैत्रिस , समृधीचे द्वार देवाने उघड़ले.

आपुलकीच्या त्या डबक्यातच, हसण्याचे मर्म आम्हास उमगले.


Rate this content
Log in