काळ कोरोनाचा
काळ कोरोनाचा

1 min

11.8K
बऱ्याच दिवसांनी जुनपण जाग झालय
शहरात सुद्धा पाखरू दिसायला लागलय,
ओस पडलेल्या जागा ओसच आहेत
पण तिथ मानुसपण दिसायलय !
एका जंतूने काळ गाजवलाय
गजबजलेला माणूस विझवलाय,
मानव पण किती ना
प्रथमच पैश्यापेक्षा जिवाला घाबरलाय !
दिसेल त्या रस्त्याने परततोय
कधी काळी आलेल्या ठिकाणी फिरकतोय,
काही तरी असेलच त्या जंतूत
जो तू इतका जिवाला घाबरतोय !
कुठंतरी आपणही चुकतोय
ऐका विषाणू पासून शिकतोय,
दिसत नाही तो जीव खुप सांगून जातोय
गावच गावपण पुन्हा भरून काढतोय !