निष्पाप बालपण
निष्पाप बालपण
वेळ येतो वेळ जातो
त्यासोबत चालतो आपण,
त्या क्षणांना उजाळा द्यायला
राहते आठवण राखण.
वेळेचा नसतो भान
जेव्हा भेटतो मित्र छान,
आठवुन सर्व गोष्टी
पुन्हा होतो आपण लहान.
शाळेची येताच आठवण
आठवते डब्याचे झाकण,
पण वेळ गेल्यावर समजते
तेच होते खरे जीवन.
कॉलेज मध्ये आम्ही
करायचो खूप गंमत,
मित्रांची होती संगत
म्हणून जीवन होते रंगत.
माझ्या गावच वर्णन न्यार
तेथील भरीव आठवडी बाजार,
आमच्या चिंचेचा तो पार
अजूनही देतो हाकार.
माझे आदर्श आई बाबा
ज्यानी शिकवली मला संस्कृती,
करून त्यांची क्रुती
करणार मी स्वप्नपूर्ती.
आता होत आहे मोठा
काळ आहे खोटा ,
पण आठवतो तो ओटा
जिथे होतो मे छोटा.
त्या निष्पाप जगातून
आलोय पाप घ्यायला,
त्याच भोळेपणाच्या जगात
पुन्हा नाही का येत जायला ?
एवढेच विचारतोय देवा
समजून घे माझे भाष्य,
का पुन्हा नाही बालपण
इतकेच मजेत नैराश्य.
