जीवनाचा भागीदार
जीवनाचा भागीदार


तुझ्या प्रत्येक सुखात
भागीदार मी होईन
तुझ्या प्रत्येक दुःखात
आधार मी देईन
जीवनाच्या भागीदारीत
साथ तुला देईल
तुझ्यासाठी मी
सगळं काही करीन
अंधारलेल्या जीवनात
ज्योत मी लावीन
डोळ्यातील स्वप्न
आता पूर्ण करीन
तुझ्या हसण्याचे कारण
मला बनायचे आहे
शेवटच्या क्षणापर्यंत
फक्त तुझं व्हायचे आहे