जगायचे राहूनच गेले..
जगायचे राहूनच गेले..
1 min
314
आठवणीत तुझ्या मागे मागे फिरताना
स्वप्नात घेऊन तुला
तुझ्यासवें चालताना
वास्तवात मात्र तुझ्यासवें
जगायचे राहूनच गेले..
पावसात चालतो मी
आजही एकटा
डोळयांत साठलेल्या अश्रूंना
पावसाच्या पाण्यात सांडत
तुझ्यासाठी आजवर मी जगत आलो
पण तुझ्यासाठी जगता जगता
स्वतःसाठी मात्र
जगायचे राहूनच गेलें
इतरांसाठी खूप जगलं
आज स्वतः साठी थोडं जगावं म्हनलं
पण हे सगळं म्हणता म्हणता
पुन्हा आठवलं मला
जगायचे राहूनच गेले..
विचार केला शेवटचा एकदा
मरता मरता थोडं जगून घ्यावं
स्वतःच्या कवितेत थोडं
हरवून जावं
कवितेचं शेवटचं पान
हे समजू घ्यावं
अन जगायचे राहूनच गेले
