STORYMIRROR

Nilesh Bamne

Others

4  

Nilesh Bamne

Others

जागतिक महिला दिन...

जागतिक महिला दिन...

1 min
510

जागतिक महिला दिन...

झालाही असेल कदाचित जन्म

एका स्त्रिचा पुरूषापासून

पण विश्वातील तो

एक पुरूष सोडला तर

समग्र पुरूष जातीला

जन्म स्त्रियांनीच दिला...

स्त्रिला जन्म देताना

पुरूषाला वेदना

झाल्या असतील – नसतील

पण पुरूषांना जन्म देताना

स्त्रियांना होणाऱ्या वेदना

पुरूष वर्षानुवर्षे पाहतच आला...

स्त्रियांनी पुरूषांना फक्त

जन्मच दिला नाही

तर खायला दाणा,

राहायला आसरा,

प्रेम, जिव्हाळा

आणि संस्कारही दिला...

पुरूषांनी स्त्रियांना

आपल्या मनात, हृद्यात

आणि प्रसंगी देव्हाऱ्यातही बसविला

पण आपल्या बरोबरीला

कधीच उभा नाही केला...

आजही का करावा लागतोय

संघर्ष स्त्रिला पुरुषांसोबत

आपल्याच अस्तित्वासाठी

तीच कारक असताना

पुरूषांच्या अस्तित्वाला...

का करावी लागतेय

पुरूषांना व्यक्त

आपली कृतज्ञता

स्त्रियांच्या प्रती

फक्त जागतिक महिला दिनाला...

समग्र विश्वाची मालकीन असणारी स्त्रीच

का शोधतेय एक निमित्त

स्वतःची ओळख जगाला सांगायला...

जागतिक महिला दिन

खरं म्हणजे साजरा करण्याची

गरजच का भासावी जगाला...


Rate this content
Log in