STORYMIRROR

कविता बिरारी

Others

2  

कविता बिरारी

Others

इथे ओशाळली मानवता

इथे ओशाळली मानवता

1 min
816



ओशाळली मानवता


रस्त्यावर निर्घृण खून पाहूनही कोठे जाते तत्परता

सरकारी कायद्यास का भिता

कारण ओशाळली मानवता


गर्भात कळी खुडता

लज्जा शरम सोडूनी देता

दर्शन प्रवृत्ती हीनता

इथे ओशाळली मानवता


मृत्यू च्या दाढेत रुग्ण चालला

फी साठी काही डॉक्टरांचा धंदा चालला

परिस्थिती व माणुसकीची फारकत करता

कारण ओशाळली मानवता


पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करता

काळे कृत्य करण्या धजता

बुद्धी मने अस्वच्छता

कारण ओशाळली मानवता


कर्जापायी बेजार होता

कर्जापायी फाशी घेता

कुटूंब उघडेबोडके होता

कारण ओशाळली मानवता


रॉकेल, डिझेल चे भाव गगनाशी भिडले

महागाईने कंबरडे मोडले

ओशाळलेल्या मानवतेचे नित्य दर्शन घडले

कोणतेही सरकार येवो का म्हणावे आपुले


झाडे जीव की प्राण असता

अमानुष पणे कु_हाड चालविता

वृक्षांच्या मुक्या भावनाही बोलता

कसं समजावू ओशाळली मानवता सहृदयता


विसरून नीतिमत्ता

काय कामाची विदवत्ता

परस्पर सहकार्याची भावना विसरता

मग नक्कीच ओशाळली आज मानवता


Rate this content
Log in