STORYMIRROR

कविता बिरारी

Others

2  

कविता बिरारी

Others

फसवाफसवी

फसवाफसवी

1 min
253

फसवाफसवी चालवलीय शेतक-यांची

पिळवणूक सोबत फुकटची

काय पाँलिसी यामागे शासनाची

समजूत काढून नाही मिटायची


फसवाफसवी नको वाहतूक नियमाची

सक्ती केलीय हेल्मेटची

नाकाबंदी आता गरजेची

तैनात फौज पोलीसांची


फसवाफसवी सरकारची

योजना फक्त कागदावरची

फाईल बासनात गुंडाळायची घाई निवडून येण्याची


फसवाफसवी सामान्यांची

क्षणिक स्वस्ताई क्षणिक महागाईची

रोख रकमेवर पाबंदीची

घसरण केली व्याजदराची


फसवाफसवी जिंकून येण्याची

इव्हीएम मशिन वाटते का संशयाची

सोबत व्हीव्हीपँटची

सीआयडीकडे सोपवायची


हयात इथच संपायची

मल ई मलिदा लाटायची

वेळच निघून जायची

मते कच-यात जायची



Rate this content
Log in