हुंडा
हुंडा
1 min
343
गळा आवरलंय रूढी परंपराने
प्राण जातोय हुंडा पद्धतीने
मसणवटी जिवन झाले मुलीचे
त्रासापाई आत्मघात केले तिने
अजूनही सुरु हुंडा देणे घेणे
कोणी पैशाचा लोभ ना सोडे
कोण म्हणते पोरगी
ओझं वाटते बापले
मी म्हणते मुलालेच
आणलं विकाले
हुंडा घेणे कोणती प्रतिष्ठा वाटते
तरीही ताठमान करून पोराले बाजारात आणते
