होईल आज तुझी माझी भेट
होईल आज तुझी माझी भेट
1 min
499
समिंदराच पाणी खारट खारट
डोळ्यामंदी माझ्या हाय साठलेलं
पिरतीत तुझ्या मन झालंय पिसाट
ह्रिदयात माझ्या तुझं प्रेम भिनलेलं....
तुझ्या पिरतीच फुल केसात माळलं
काळजावर सख्या तुझं नाव रे गोंदल
सागराची लाट बघ झालीय पिसाट
आज होईल तुझी माझी गाठभेट
सागराच्या किनारी करू घोडेस्वारी
धुंद होऊनि एकमेकात विसरुया दुनियादारी
तू जिवाभावाचा माझा जिवलग सखा
हळुवार घे गोड गालाचा या मुका
लाटांवरी लाटा आदळती बघ
काळजात दाटले पिरतीचे मेघ
झाल्या आणाभाका पुरे, धर माझा हात
एक होऊ चल दोघे, दे उभ्या आयुष्याची साथ...
