हळद पिवळी
हळद पिवळी
1 min
14.2K
कुणाची पोर गोरी,कुणाची सावळीच असते.
गरीबाची किंवा श्रीमंताची,हळद पिवळीच असते.
ऊभा आडवा मंडप,चालले मसाल्याचे कांडप.
हळदीची स्वप्ने मात्र कोवळीच असते.
माखली हाती मेहंदी,चढली हळदीची धुंदी
कपाळी अजून लोंबती,मंडोळीच असते.
वाजतो बेंडवाजा, सावरतो नवरा राजा
येणे जाणे पित्याचे,धावपळीचे असते.
कितीही गा गाणे,वाजवा नवे तराणे
प्रत्येकीचे जीणे एक, चारोळीच असते.
