हे कोण ठरवतं ...
हे कोण ठरवतं ...
कोणी ? कधी ?? कुणाच्या ???
कसं प्रेमात पडावं ????
हे कोण ठरवतं ?????
नियती ? प्रारब्ध की आणि कोणी ??
मनाच्या गाभाऱ्यातही कोठेच नसणारे अचानक कसे होतात ?
राजे आपल्या मनाचे ? ??
हृद्यालाही वेदना देतात
जे आयुष्यभराची...
तेच का होतात
आपले अंतिम ध्येय
आणि स्वप्नही...
त्यापूर्वीच्या साऱ्या ध्येयाच्या
आणि स्वप्नांच्या उरावर बसून ?
यालाच प्रेम म्हणत असतील जगात
पण प्रेम हे असे
आपल्याला आपल्यापासून
तोडणारे का असते ?
मला का नाही ठरवता येत ?
मी कोणाच्या प्रेमात पडावे ??
तिने वेदना द्यावी , विरह द्यावा
हृदयाला जखम द्यावी
आणि आपण ती आनंदाने मिळवावी...
हे कोण ठरवतं ?...
