गझल
गझल
1 min
243
मनात प्रेम कुणाचे ठसून का गेले
क्षणात जीवन माझे फुलून का गेले
उदास भाव न आता दिसे मला चित्ती
सुखात चांदण गाली हसून का गेले
उरातल्या जखमा तूच सांधल्या माझ्या
जुने किती सल सारे सरून का गेले
खुशाल छेडत गेले नवे तराणे हे
तुझ्या सुरात अशी विरघळून का गेले
न एक शब्द निघाला तुझा न माझाही
तरी मुक्यात उसासे कळून का गेले
