STORYMIRROR

Hemlata Meshram

Others

3  

Hemlata Meshram

Others

घे जगून तू

घे जगून तू

1 min
11.6K

प्रत्येक ओळीत जगण्याची

ज्योत उजळव तू 

या शब्दांच्या खेळात

घे नव्याने जगून तू


हृदयस्पर्शी भास मनाच्या 

कोपऱ्यात साठव तू 

या शब्दांच्या खेळात

घे नव्याने जगून तू 


इंद्रधनुच्या रंगात कल्पनेचा

गंध मिसळव तू 

या शब्दांच्या खेळात 

घे नव्याने जगून तू 


प्रेरणादायी विषय प्रत्येक

माणसात रुजव तू 

या शब्दांच्या खेळात 

घे नव्याने जगून तू 


पुन्हा डोळ्यातलं पाणी 

कवितेत उधळव तू 

या शब्दांच्या खेळात 

घे नव्याने जगून तू 


Rate this content
Log in