गेले ते दिवस
गेले ते दिवस




गेले ते दिवस
राहिल्या त्या आठवणी
मैत्रिणीसोबतचा प्रत्येक क्षण
आहे माझ्या मनी.......
आठवतो तो दिवस आजही
झाली होती मैत्री ज्या दिवशी
अनपेक्षित अशी ही मैत्री
फुललीये आज पिसाऱ्या सारखी
गोड होते ते क्षण
आणि कॉलेज मधल्या त्या मैत्रिणी
गेले ते दिवस
राहिल्या त्या आठवणी .......
आठवते ती वर्गातली दंगा-मस्ती
रंगवलेली गाण्यांची मैफिली ती ....
खाललेली ती भेळ आणि पाणीपुरी
आणते आठवण पुन्हा त्या क्षणांची
गेले ते दिवस
राहिल्या त्या आठवणी......