दीपज्योती
दीपज्योती
1 min
160
सूर्यरूप तू, अग्नीरुप तू,
ओजस्वी ते तेजरुप तू.
गंधाक्षत अन् पुष्प वाहूनी,
भाव भक्तीने करते पूजन.
इडापिडा टळो, टळो अमंगल,
भावभक्तीचा प्रकाश उज्ज्वल.
करू प्रार्थना हात जोडूनी,
ज्ञानज्योतीने उजळो तनमन.
हृदयी राहो ज्योती अग्नीची,
तेवत आमुच्या आस मनीची.
शत्रुबुद्धीचा विनाश करूनी,
जगता लाभो शांती-समाधान.
हेच मागणे दीप ज्योतीला,
तिमिरातून उजळी भूवनाला.
तव तेजाचा अंश घेऊनी,
तेजोमय व्हावे सारे जीवन.
लाभो आरोग्य आणि संपदा,
तळपत राहो ज्ञानसूर्य सदा.
तव तेजाला वंदन करूनी,
काव्य सुमन हे करीते अर्पण.
