ती.......
ती.......
ती भेटते…..
आईच्या वत्सल स्पर्शातून…..
आजीच्या मऊ- उबदार गोधडीतून…..
बहिणीच्या अवखळ प्रेमातून…..
काकू-मामी-मावशी- आत्याच्या कौतुक भरल्या नजरेतून…..
वहिनीच्या आश्वासक शब्दातून……
नणंदेच्या स्नेहल पाठिंब्यातून…..
जावेच्या निर्मळ मनातून…..
मैत्रिणीच्या नि:शब्द साथीतून…..
सासूच्या खंबीर आधारातून.....
लेकीच्या लडिवाळ मिठीतून.....
सुनेच्या प्रेमळ मार्दवातून......
ती…..
ती भेटते…..
समईच्या स्निग्ध प्रकाशातून…..
पणतीच्या मिणमिणत्या उजेडातून…..
निरांजनाच्या फडफडत्या ज्योतीतून…..
दिवटी-मशालीच्या लख्ख ज्वाळेतून…..
ती…..
ती भेटते विविध रूपातून…..
लक्ष्मीच्या लखलखत्या तेजातून…..
सरस्वतीच्या मंद, शांत वीणेतून…..
दुर्गेच्या रौद्र हुंकारातून…..
ती…..
जगत्जननी…..जगदात्री…आदिमाया….. आदिशक्ती .….
तिला त्रिवार वंदन
