देवी आणि स्त्रियांमधील भेद
देवी आणि स्त्रियांमधील भेद
1 min
159
पुजता तुम्ही देवीला अन्
स्त्रीची अशी वाईट दशा,
पूजता ही एका स्त्रीला अन्
अपमान ही एका स्त्रीचाच.........
स्त्री एक आई असते ना !
आईला मान देतो आपण,
इतर स्त्रियांचे का हाल हाल ?
एकीकडे देवीला पुजतो ना !
दुसरीकडे स्त्रीचीच उपेक्षा का ?..........
स्त्री लाचार आहे म्हणून फायदा
देवीचा कोप होतो अवमान नको,
पण तिच्या रुपाची मात्र उपेक्षाच
प्रत्येक स्त्रीमध्ये देवीच वास करते.......
