डोकेदुखी
डोकेदुखी
(दहाक्षरी कविता)
सकाळी मारा फेरफटका
कोवळ्या उन्हात थोडं बसा
डाॅक्टरांनी दिला तिला
सल्ला दिवसभरात खूप हसा!
नविन काहीतरी वाचावे
प्रिय व्यक्तीसोबत बोलावे
आवडेल जे-जे ते लिहावे
रिकामी बसणेही टाळावे!
मित्र-मैत्रिणींशी टच रहा
सुखदुःखांत त्यांना साथ द्या
'गेट टू गेदर' प्लॅन करा
सार्यात तुम्ही पुढाकार घ्या!
ती म्हणाली, 'हे' सारं करते
सुर्य येता मोबाईलवर
गुड माॅर्निंगच्या मेसजने
फेरफटकाही तासभर
वाचन लेखन भरपूर
'चॅटींग'चं बोलणं असतं
बिलकुलही नसतो वेळ
'नेट' तेवढं 'विक' असतं
सर्वांच्या 'टच' मध्ये असते
शुभेच्छांचा पाऊस पाडते
खूप ग्रृपची आहे पुढारी
फेसबुकवरही असते
पण रिप्लाय नि रिस्पोन्सस
न मिळाल्याने नाराजी येते
त्यात मोबाईल होतो हँग
मग 'डोकेदुखी' सुरु होते
डाॅक्टर संतापून म्हणाले
'डोकेदुखी'ला औषध नाही
डोकं फुटायला आले माझे
तुम्ही लवकर नीघा बाई!
