STORYMIRROR

Kamlesh Gosavi

Others

3  

Kamlesh Gosavi

Others

अनिल दादा

अनिल दादा

1 min
137

नावातचं आहे झंझावात

अमेरिकेतही तो उठतो

मोठ्या माणसाचे मोठेपण

दादा.. सामान्यातही बसतो


सदा सळसळते तारुण्य

हसण्यात वेगळीच जादू

बुद्धी ढासून भरलेली

दादा.. आधुनिक साधू


माणसं कापणारा व्यवसाय

तरीही माणसं जोडण्याचा धंदा

लुटारुंच्या टोळीतला

दादा.. वेगळाच बंदा


लाल मातीची ओढ

सोनं पिकविण्याचे वेड

शाळा सुरू करुनी

कुडाळात रोवली मुहूर्तमेढ


दादा.. विकासाची कल्पना

आहे आमची नवी

फक्त नि फक्त

तुमची साथ हवी!

तुमची साथ हवी!


साहित्याला गुण द्या
लॉग इन