चंद्र आहे साक्षीला...
चंद्र आहे साक्षीला...
तू आली आज माझ्या भेटीला
बघ हा चंद्र आहे साक्षीला
चांदण्यात बसून फिरताना
मी पाहिलं तुला
चोरून मला बघताना...
चांदण्या राती बसून सखे
करू चार गोष्टी प्रेमाच्या
प्रेम तुझ्यावर करतोय मी
हे आज सांगण्यास तुला
बघ चंद्र आहे साक्षीला..
तुझ्या साठी गुलाब मी आणलंय
ये माझ्या जवळ तू जरा
केसात तुझ्या मी हा गजरही माळतो
श्रुंगार तुझं मी करताना
बघ हा चंद्र आहे साक्षीला..
खूप प्रेम करूनही तुझ्यावर
दुःख माझ्या आज वाटेल आलं
चांदण्या राती बसून मी सखे
आठवणीत तुझ्या मी रडतोय आज
अश्रू माझे पाहण्यासाठी
बघ चंद्र आहे साक्षीला..
नको आता हा दुरावा तुझा
जवळ येऊन मला मिठीत तू घे ना जरा
कवितेत तुला मांडून मी
वेड्यागत तुझ्याशी बोलतोय जरा
वेड्यागत बोलताना पाहून मला
हा चंद्र हसतोय गालात जरा
गालात कसा तो हसतोय जरा
म्हणूनच बघ चंद्र आहे साक्षीला माझ्या...
