चकवा
चकवा
1 min
98
तू असल्याचा मला का
हा भास होतो खोटा
मिळतो कायम मला
तुझ्या आठवणींचा चकवा
स्वप्नाच्या या दुनियेत
फिरतो मी तुझ्या मागे मागे
शोधते ही नजर माझी
कायम तुला गं राणी
स्पर्श तुला करता माझ्या
अंगावर यतो प्रेमाचा शहारा
स्पर्श होता तुझा की
माझ्या या मनाचा चकवा
प्रेमाची ही वाट माझी
कायम चुकते या चांदराती
या चांदणीतही दिसतो मज तुझाच चेहरा
मग मिळतो एक क्षणाचा चकवा
चकवा माझ्या या मनाचा
कुणाला नाही समजला
आठवणीत तुझ्या मी असता
मिळतो मला माझ्या कवितेचा चकवा
