बळ
बळ
1 min
244
हसण्याचं बळ
तुला बाळाची गं कळ
साहुन जगी सर्व छळ
आये येतं गं कुठुन???
कुक्काचा गं टिळा
तुझा भरतार कावळा
तोंडी सबूद सोवळा
आये येतं गं कुठुन???
घास चविष्ट गं बाळा
तुझ्या पानात जोंधळा
मुखी परकास सोहळा
आये येतं गं कुठुन???
तुझ्या वाटी सर्व काटे
पाई कुरूप ssss पाठी धपाटे
तरी देशी मज सपन सोहळा
आये येतं गं कुठुन???
