Vishal Ambhure

Others

3.1  

Vishal Ambhure

Others

बहीण तू माझी..!

बहीण तू माझी..!

1 min
92


नसली जरी रक्ताच्या नात्याची,

बहीणीचं नातं निभवण्यात महान आहे||१||


अशी माझी बहीण तू माझी शान आहे, 

मनाशी-मन जुळून बनलेलं बहीण-भावाचं नातं आपलं खरंच किती महान आहे||२||


खरं सांगू दिदी तुझ्या प्रत्येक शब्दात मला मान आहे, 

तू केलेली तारीफ तर माझ्यासाठी एक स्फूर्तीचा जिवंत झरा आहे, 

खरंच मला एक समजदार बहीण मिळाली, 

मी नशीबवान आहे||३||


सख्खी बहीण नसताना मला त्याची कधी जाणीव नाही होऊ दिली याचं मला भान आहे,

खरच दिदी तू माझ्यासाठी महान आहे||४||


गंध आपल्या नात्याचा असाच पसरू दे अशी तुला आण आहे, 

आणि खरं सांगू दिदी आपल्या नात्याला माझ्या नजरेत एक वेगळाच सन्मान आहे||५||


Rate this content
Log in